Nasrapur incident to education of tribal children, important decisions were taken in the cabinet meeting : आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत असते. त्यामध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. त्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पुण्यातील नसरापूर आत्याचार घटना तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. कोणते आहेत हे निर्णय?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
विधी व न्याय विभाग
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधी व न्याय विभागाा आदेश दिले आहेत की, लैंगिक गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका. लैंगिक शोषणातील आरोपी हे 80 ते 90 आरोपी हे पॅरोलवर असतात. त्याच वेळी अश अनेक अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल दिल जाऊ नये. असे आदेश स्वत: फडणवीसांनी दिले आहेत. दरम्यान 2014 ते 2019 या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना कायदा केला होता. मात्र तो दोन ते तीन वर्षे अस्तित्वात होता कालांतराने न्यायालयाने रद्द केला. आता पुन्हा एकदा तसाच कायदा करा सेंटर देण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभाग
आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी.
