Download App

विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात येणार? मुंबई अन् नागपूरमध्ये होणार खलबतं

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भारतीय जनता पक्षाने (BJP) तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मुंबई आणि नागपूरमध्ये पक्षाच्या दोन महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 तारखेला नागपूरमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील सहकारी मित्रांशी समन्वय कसा साधायचा याबद्दल ते पदाधिकारी आणि आमदारांशी संवाद साधणार आहेत. यात शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत ठेवून सत्तासूत्रे निश्चित करण्याबद्दलच्या वाटाघाटींवरही चर्चा होणार आहे. (National General Secretary Vinod Tawde will attend two important and big events of the party in Mumbai and Nagpur)

छत्तीसगडमध्ये आणखी एक धक्का, पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री तर रमण सिंग नव्या भूमिकेत

विनोद तावडे यांची सध्या राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिथे मुख्यमंत्री निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर ते नागपूरमध्ये येणार आहेत. त्यानंतर 16 डिसेंबरला पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकसभा आणि विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडणार आहे. यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे मार्गदर्शन करणार आहेत.

काय आहे नेमके राजकारण?

आगामी दोन्ही निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपचा चेहरा राहणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र त्यांच्यासमवेत असणाऱ्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मदत करण्यास राज्याची माहिती असलेले नेते म्हणून तावडे यांना पुन्हा सक्रिय केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीत ‘या’ दिवशी होणार इंडिया आघाडीची बैठक, जागावाटपावर चर्चाही होण्याची शक्यता

दुसऱ्या बाजूला मुंबईत भाजपची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर आहे. त्यांच्या जोडीला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या नेत्यांना देण्यात आले आहे. पण हे दोघेही बाहेरच्या पक्षातून आल्याने या नेत्यांबद्दल जुन्या कार्यकर्त्यांत काहीशी नाराजी असल्याचे दिसून येते. हा समतोल साधण्यासाठी तावडेंचा प्रवेश प्रयत्न मानला जातो आहे.

Tags

follow us