Download App

आनंदाची बातमी! राज्यातील मंतैय्या बेडके आणि सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

National Teacher Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची (National Teacher Award) घोषणा करण्यात आली असून यावेळी राज्यातील दोन शिक्षकांना

  • Written By: Last Updated:

National Teacher Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची (National Teacher Award) घोषणा करण्यात आली असून यावेळी राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणार आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील मंतैय्या बेडके (Mantaiya Bedke) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सागर बगाडे (Sagar Bagade) यांना यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणार आहे.

राजधानी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्याहस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. मंतैय्या बेडके गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आहे तर सागर बगाडे कोल्हापुरातील सौ.स.म.लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील कलाशिक्षक आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर दोन्ही शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंतैय्या बेडके आणि सागर बगाडे यांच्यासह देशातील 50 शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची देखील माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. विज्ञान भवनात 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्याहस्ते या शिक्षकांचा सन्मान होणार आहे. रोख 50 हजार रुपये, रौप्यपदक व प्रमाणपत्र असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार, अजितदादांची होणार कोंडी ?

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देणारे मंतैय्या बेडके यांना पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे तर सागर बगाडे देखील विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. कलाशिक्षक म्हणून सागर बगाडे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Jay Shah ICC New Chairman : मोठी बातमी! BCCI सचिव जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी निवड

follow us