सुरजागड स्टील प्लांट : गडचिरोलीचा चेहरा-मोहरा बदलणारा प्रोजेक्ट

सुरजागड स्टील प्लांट : गडचिरोलीचा चेहरा-मोहरा बदलणारा प्रोजेक्ट

गडचिरोली जिल्हा म्हंटलं की समोर येते ती शिक्षा. अधिकाऱ्यांसाठी गडचिरोलीला (Gadchiroli) जाणे म्हणजे शिक्षेचाच एक भाग वाटतो. राजकारणीही अधिकाऱ्यांना दम देताना अनेकदा ‘गडचिरोलीलाच पाठवेन’ असे म्हणतात. याचे कारण इथले मागसलेपणा. इथला मागसलेपणा दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत. पण नक्षलवाद्यांमुळे या सगळ्याला खीळ बसते. मात्र नुकताच गडचिरोलीत सुरु झालेल्या एका प्रकल्पाने आता गडचिरोलीचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे सुतोवाच सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प आणि यामुळे कसा जिल्ह्याच्या चेहरा मोहरा बदलू शकतो… पाहुया (steel project has been started at Surjagad in Gadchiroli.)

गडचिरोलीतील सुरजागड इथे एक पोलाद प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. प्रकल्प खाजगी असला तरी त्याचे भूमिपूजन राज्य सरकारच्यावतीने झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली. याच प्रकल्पामुळे गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलू शकतो असा दावा केला जात आहे. वर्षानुवर्षे मागास असलेल्या गडचिरोलीमध्ये सरकारच्या मते सुरजागड प्रकल्पातून आठ दशलक्ष तर लॉईड्स प्रकल्पातून चार दशलक्ष पोलाद तयार होईल. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात 30 टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार आहे.

आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर

गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार्‍या उद्योगात 80 टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली आहे. याच स्थानिक नागरिकांना फायदा होईल, असा दावा आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातीन जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. आदिवासींचे दैवत असलेले ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, याची हमी सरकारने दिली आहे. चार्मोशीत सुद्धा 35,000 कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून 20,000 इतकी रोजगारनिर्मिती होणार असल्याचा अंदाज आहे. सुरजागड प्रकल्पातून सात हजार पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, असा दावा मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

“महायुती-मविआ दोघांनी मिळून आरक्षण द्या अन्यथा..” मनोज जरांगेंचा नवा इशारा काय?

आत्राम यांनी तर या स्टील प्लांटसाठी स्वतःची 125 एकर जमीन दान केली आहे. भारत सरकारने 2017 मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार, भारताने 300 दशलक्ष टन कच्च्या स्टीलची क्षमता आणि 255 मेट्रिक टन उत्पादन क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टामध्ये गडचिरोली मैलाचा दगड ठरणार आहे हे नक्की. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ, रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. येथील मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. 170 कोटींचे इनोव्हेशन सेंटर तयार होत आहे. त्यामुळे हा जिल्हा लवकरच मुख्य प्रवाहात येऊ शकेल, असा दावा केला जात आहे. पुढील काही दिवसात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणखी काही उद्योग जिल्ह्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे गडचिरोलीची बिझनेस हबच्या दिशेने वाटचाल सुरु झालीय असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube