आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर

आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर

Paris Olympic 2024 :  पॅरिस स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनमधील मोहिमेस (Paris Olympic) आज शनिवारपासून सुरुवात होत आहे. पी. व्ही. सिंधू हिची नजर सलग तिसऱ्या ऑलिंपिक पदकावर आहे. सिंधूने सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यास ती देशातील महान क्रीडापटूंपैकी एक ठरेल. तर, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला ऑलिंपिकमधील देशाचं पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक खुणावत आहे.

यंदा ११३ जणांचा चमू Paris गाजवणार; कधी, केव्हा अन् कधीपर्यंत?, वाचा भारताचं A टू Z वेळापत्रक

मागील दोन ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूने अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक जिंकलं आहे. आणखी एका पदकासाठी तिला कामगिरी उंचावणारा खेळ करावा लागेल. फ्रान्सच्या राजधानीत यावर्षी सात्विक व चिराग जोडीने सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेत पुरुष दुहेरी किताब पटकावला होता, या शहराशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध भारतीय जोडी कायम ठेवण्यास इच्छुक असेल. एच. एस. प्रणोय व लक्ष्य सेन यांची पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे. ते दोघेही पदकासह मायदेशी परतण्यास इच्छुक असतील. मात्र, त्यापैकी फक्त एकटाच पदक जिंकू शकेल. कारण प्राथमिक फेरीचा टप्पा पार केल्यानंतर प्रणोय व लक्ष्य यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याचे संकेत आहेत.

सिंधूला खेळ उंचावणार 

सिंधूची पॅरिस ऑलिंपिकपर्यंतची वाटचाल ठिसूळ ठरलेली आहे. यावर्षी फेब्रुवारीत तिने दुखापतीनंतर पुनरागमन केलं. मलेशिया मास्टर्समध्ये ती उपविजेती ठरली. हा अपवाद वगळता तिची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली नाही. टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने कोरियन प्रशिक्षक पार्क तेय-सँग यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राँझपदक जिंकलं होतं. कालांतराने तिने मलेशियन हफिज हशिम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. त्यानंतर तिने प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत मुक्काम हलविला, तेथे इंडोनेशियन प्रशिक्षक अगुस सांतोसो यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मेहनत घेतली.

सात्विक-चिराग जोडी महिला आशिया करंडक आजपासून; सलामीला भारताचा सामना पाकिस्तानशी; जाणून घ्या वेळापत्रक

भारताची महिला दुहेरीतील अनुभवी खेळाडू अश्विनी पोन्नाप्पा हिच्यासाठी पॅरिस ऑलिंपिक कदाचित शेवटची असेल आणि तिसऱ्याच वेळेस यशस्वी ठरण्याचे तिचे प्रयत्न असतील. नवोदित तनिशा क्रास्टो ऑलिंपिकमध्ये पदार्पण करत असून ती अश्विनीची दुहेरीतील साथीदार आहे. एकेरीतील खेळाडूंसाठी वाटचाल अडथळ्याची असली, तरी भारताची दुहेरी जोडी पदकासाठी दावेदार असेल. सात्विक-चिराग जोडीने यावर्षी पुरुष दुहेरीत दोन स्पर्धा जिंकल्या असून चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube