Download App

आपली महती मंत्रालयात जोरदार रंगलीये बरं का.. अजित पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचा विखेंना टोला

राधाकृष्ण विखेपाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री विखेंवर जोरदार पलटवार केलाय.

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari on Vikhe Patil : महायुतीमध्ये कायम कुरबूरी सुरू असतात. कधी निधी वाटप तर कधी मतदारसंघातील श्रेयवाद. आता नुकताच भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर गंभीर आरोप केला. (Vikhe Patil) त्यानंतर, विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. या सगळ्यावर आता अमोल मिटकरी यांनी विखे पाटलांवर बोचरी टीका केली आहे.

विखे पाटलांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला मिटकरींनी जोरदार पलटवार केला. भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा टोला मिटकरींनी लगावला आहे. विखे पाटील विसरले असावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. अजितदादांवर टीका करताना जरा जपून असंही ते म्हणाले आहेत. भाजप श्रेष्ठी याची दखल घेतील, असंही मिटकरी यांनी म्हटलं. तसेच, बाकी विखे पाटील आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बर का, उगाच खेटे घेऊ नका असा टोलाही मिटकरी यांनी लगावलाय.

मलाही काही लोक भेटली अन्,शरद पवारांच्या त्या; दाव्यानंतर विखे पाटलांचा खळबळजनक दावा

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजेच अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्यावरती टीका करत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यावर देखील घसरले आहेत.

ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा, असं म्हणत अजित पवारांवर टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना संबोधित करत, साखर धोरणावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे, आता महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे.

follow us

संबंधित बातम्या