Navnath Ban On Nilesh Rane : पुणे पदवीधर निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे तर दुसरीकडे शिवसेने नेत्यांकडून देखील नवनाथ बन यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळेच भाजपचा पराभव झाला असल्याचा दावा नवनाथ बन यांच्याकडून करण्यात आला आहे. तर यावर बोलताना शिवसेना आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांची लायकी काढली होती. नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती? असं एक्सवर निलेश राणे म्हणाले होते. तर आता या पोस्टला प्रत्युत्तर देत नवनाथ बन यांनी माजी मंत्री नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि त्यावर कॅप्शन लायकी असं दिले आहे.
माजी मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत फोटो शेअर करत नवनाथ बन (Navnath Ban) यांनी लिहिले की, ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लिडर नारायण राणे साहेब! #लायकी. नवनाथ बन यांच्या या पोस्टवर आता निलेश राणे (Nilesh Rane) काय उत्तर देणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं.
तुझी लायकी किती तू बोलतो किती.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2026
नेमकं प्रकरण काय ?
पुणे पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या पराभवाचे खापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले होते. यावर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, पदवीधर लढत होता तुम्ही आम्हाला एकही संदेश पाठवला नाही. तरीही आम्ही सहकार्य केले. आम्हाला नवनाथ बनने शिकवू नये, काम कसे करायचे. नवनाथ बन माझा मित्र नाही. तो माझा ज्युनिअर आहे. मी 2009 मध्ये खासदरा झालो तेव्हातो चड्डीत होता. मी कोणालाही मित्र बनवत नाही. नवनाथ बन म्हणतो, शिवसेनेने पुणे पदवीधरला आम्हाला मदत केली नाही. मी साताऱ्यात होतो. वाई आणि फलटणची जबाबदारी माझ्यावर होती.
Junior Navnath Ban with Senior Leader, Hon. Narayan Rane Saheb!
#लायकी https://t.co/59fG3eQOMH
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 31, 2026
माझ्या जिल्ह्याप्रमुखाला माहिती नव्हतो, पदवीधरचं काम करायचे आहे. भाजपचा कोणताच माणूस आला नाही. पदवीधर लढत होता तुम्ही आम्हाला एकही संदेश पाठवला नाही तरीही आम्ही सहकार्य केले. नवनाथ बन तू कोण आहेस? आम्ही आमच्या नेत्यांना, फडणवीसांना उत्तर देऊ असं आमदार निलेश राणे म्हणाले.
