Download App

जरांगेला गलॅक्सी हॉस्पिटल ऐवजी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं; नवनाथ वाघमारेंची घणाघाती टीका

मनोज जरांगे पाटील आणि नवनाथ दोडचा सीडीआर गृह विभागाने तपासले पाहिजे. नवनाथ दोडचा आका मनोज जरांगे आहे, त्याच्या मुसक्या अवळल्या

  • Written By: Last Updated:

Navnath Waghmare on Manoj Jarange Patil : जरांगे सारखा चाटाळ माणूस महाराष्टात नाही, नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांना बोकांडीवर घेतले होते त्यावेळी जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं होतं असा सवाल (Jarange Patil) ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. जरांगेचा सध्या मेंदू सडलाय, जरांगेला गलॅक्सी हॉस्पिटल ऐवजी बाऱ्हाळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज, जरांगेचं काही दुखतं नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट;विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले

जरांगे हास्पिटलमध्ये वाकडा तिकडं पडतो, अंगावर ब्लॅंकेट घ्यायच , आणि प्रेस घ्यायच काम सुरु आहे. जरागे सारख्या पागल माणसाच्या नादी कोणी लागू नये, अशी विनंती करतो असंही वाघमारे म्हणाले आहेत. केलाश बोऱ्हाडे यांचा मंदिरातील व्हायरल व्हिडिओ शिवरात्रीचा नसून दोन महिन्यापूर्वीचा आहे, केलाश बोऱ्हाडे हा महादेवाचा नीसीम भक्त आहे असा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. जरांगेला अक्कल नाही, जरांगे महादेवाच्या मंदिरात गेला नाही, मंदिरात कुठे मंदिर माहित आहे का त्याला? जरांगेला शहागड परिसरातील धाबे, बार माहित आहे, जरांगे चपटी मारणारा, महादेवाची भक्ती त्यांना काय माहित आहे
असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील आणि नवनाथ दोडचा सीडीआर गृह विभागाने तपासले पाहिजे. नवनाथ दोडचा आका मनोज जरांगे आहे, त्याच्या मुसक्या अवळल्या पाहिजे. केलाश बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी आपण सुरुवातीपासूनच सोबत आहे असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं होत. यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. कैलाश बोऱ्हाडे प्रकरणात मी आणि लक्ष्मण हाके सुरुवातीपासुन नव्हतो, याच पूर्ण श्रेय दीपक बोऱ्हाडे यांना गेले पाहिजे असंही ते म्हणाले.

follow us