आर्यन खानला मोफत तिकीटं, ड्रग्सचा पुरवठा अन्….; समीर वानखेडेच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून धक्कादायक खुलासा

Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आले असून त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले. सीबीआयच्या FIR […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T113415.949

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 19T113415.949

Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आले असून त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले. सीबीआयच्या FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत. त्या सर्व मोबाईलमधील डेटाचं विश्लेषण केले जाणार आहे.

यानंतर आता समीर वानखेडे यांनी त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे फोटो व्हायरल झाले आहेत. फ्री प्रेस जर्नल नं याबसंदर्भातील वृत्त दिलं आहे. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे चॅट हे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याबरोबर झाल्याचं दिसतं आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमनं छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींचे संभाषण दिसते आहे.

Sanjay Raut criticizes BJP : हिंमत असेल तर निवडणुका घ्या…राऊतांनी दिले थेट चॅलेंज

यानुसार आर्यन खानला क्रूज पार्टीसाठी तब्बल 27 लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान व त्याच्या आठ मित्रांना ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळालं. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही, असं या चॅटमध्ये समीर वानखेडे हे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगताना दिसत आहे.

भाजपमधील सर्वजण काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? राजू शेट्टींचा सवाल

दरम्यान, बॉलिवुडमधील सेलिब्रिटी मंडळींचा वापर कशाप्रकारे केला जातो, यासंदर्भात या चॅटमध्ये दावे करण्यात आले आहे. अनेक बॉलिवुड स्टार्स या व्यवहाराचा हिस्सा आहेत. ते शहराच्या बाहेर किंवा रिसॉर्ट्समध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करतात. तिथे फुकट ड्रग्ज पुरवतात. त्यात बॉलिवुड स्टार्सला आमंत्रित करतात. म्हणजे या पार्टीचं आणखीन प्रमोशन होतं. त्यानंतर एकदा का ड्रग्जचं व्यसन लागलं, की यांचे ग्राहक उत्तरोत्तर वाढतच जातात. सेक्स हा घटक असं व्यसन लावण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याामुळे ते या पार्ट्यांमध्ये एमडीएमए आणि काही मुलींनाही बोलवतात, असेही या चॅटमध्ये म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

Exit mobile version