भाजपमधील सर्वजण काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? राजू शेट्टींचा सवाल
Raju Shetti On Devendra Fadnavis : भाजपाचं (BJP)सध्याचं राजकारण जे आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्याप्रमाणं ईडी (ED), इनकम टॅक्स (Income tax), सीबीआय (CBI) संविधानिक संस्थांचा गैरवापर करत आहेत, ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण भाजपमधील सर्वजणच काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांच्यापाठीमागे का ईडी लागत नाही? त्यांच्यापाठिमागे का सीबीआय लागत नाही, असा सवाल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana)अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. ते लेट्सअप सभामध्ये बोलत होते. त्यांनी यावेळी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis)चांगलेच वाभाडे काढले आहेत.
Pune BJP State Executive Meeting : फडणवीसांचे ज्येष्ठांना टोले की पंकजा मुंडेंना सुनावले !
राजू शेट्टी म्हणाले की, ज्यांच्या पाठिमागे ईडी, सीबीआय लागते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच इडी, सीबीआयची चौकशी थांबते, अशी परखड टीकाही यावेळी भाजपवर केली आहे. तुम्ही तुमच्या पक्षांची राजवट लादण्यासाठी जर या संस्थांचा उपयोग करत असाल तर ते अजिबात बरोबर नाही, आणि आम्हाला ते मान्य नाही. ज्या पद्धतीने धार्मिक आणि जातीय वाटणी करण्याचा, ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तेही घातक आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिले आहे त्यात या गोष्टी येत नाहीत. त्यामुळे भाजपसोबत आमचं जमणं अजिबात शक्य नाही, असं परखडपणे सांगितलं आहे.
2024 च्या आगामी निवडणुकांमध्येही आपला पवित्रा हाच असणार असल्याचं यावेळी राजू शेट्टी म्हणाले. माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे. भाजपला सोडल्यामुळं त्यांनी ठरवून माझा पराभव केला. कारण त्यांना माहित होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट विरोध करणारा देशातील पहिला माणूस मी होतो. चंद्राबाबू नायडू यांच्या अगोदर आपण विरोध केला होता. आणि एनडीए सोडणारा पहिला माणूस मी होतो, त्यामुळे त्याचा राग ठेवून कटकारस्थान करुन आपला पराभव घडवून आणला असाही आरोप यावेळी भाजपवर राजू शेट्टी यांनी केला आहे.
आपल्याला भाजप सोडल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही. कारण खासदार होणं हे आपलं उद्दिष्टच नाही. त्यामुळं आत्तासुद्धा मी एकटाच लढणार आहे. लोकांना पाहिजे असेल तर ते मला निवडून देतील. कारण आहे त्याच्यात मी समाधानी आहे. शेतकरी नेता म्हणून आपण समाधानी आहोत. गेल्या पाच वर्षात माझं काहीही बिघडलेलं नाही, असं म्हणत भाजपवर घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.