अजित पवार गटाचे संभाव्य खातेवाटप; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Ajit Pawar Portfolio :  बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून, शपथ घेतलेल्या मंत्र्यांसह अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहे. इतके दिवस राष्ट्रवादी विरोधी पक्षात होता. मात्र, आता हा पक्ष शिंदे-भाजपसोबत आला आहे. त्यामुळे इतके दिवस शिंदे-फडणवीसांच्या निर्णयांना विरोध करणार अजित पवार आणि त्यांचे सहकारी आज बैठकीला उपस्थित असणार […]

Letsupp Image   2023 07 04T125602.794

Letsupp Image 2023 07 04T125602.794

Ajit Pawar Portfolio :  बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून, शपथ घेतलेल्या मंत्र्यांसह अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहे. इतके दिवस राष्ट्रवादी विरोधी पक्षात होता. मात्र, आता हा पक्ष शिंदे-भाजपसोबत आला आहे. त्यामुळे इतके दिवस शिंदे-फडणवीसांच्या निर्णयांना विरोध करणार अजित पवार आणि त्यांचे सहकारी आज बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना तसेच जनतेला समोर ठेऊन नेमके कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आज या 9 मंत्र्यांचे खाते देखील जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यापूर्वी अजितदादा यांच्यागटाकडे कोणती खाती देण्यात येणार याची माहिती समोर आली आहे. जय महाराष्ट्र या वृत्त वाहिनीने याची माहिती दिली आहे.

शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!

अजित पवार गटाचे संभाव्य खातेवाटप

अजित पवार महसूल मंत्री, छगन भुजबळ- ओबीसी कल्याण मंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संसदीय कार्य आणि कृषी, हसन मु्श्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक व कामगार कल्याण, अदिती तटकरे यांच्याकडे महिला अन् बालविकास, धनंजय मुंडे समाजकल्याण, संजय बनसोड यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास, अशा पद्धतीचे खाते वाटप असण्याची शक्यता आहे.

आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश

दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आता नाराज होऊन काय करणार जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकाररावी लागणार असून त्याला सामोरे जावे लागणार आहे. थोडीफार नाराजी प्रत्येकाची राहणार कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला आर्धी मिळाली. तसेच आर्धी खायची त्याला पाव मिळाली. राजकारणाच समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सर्व स्वीकारावे लागेल असे म्हणत सध्या तरी पाव भाकरीत खूश असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे

Exit mobile version