राज्यातून किती मुली बेपत्ता झाल्या? आकडेवारी सांगत पवारांनी टोचले फडणवीसांचे कान

Sharad Pawar On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रिपब्लीक या वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. ( Sharad Pawar Attack On Devendra Fadanvis )  त्यानंतर […]

Letsupp Image   2023 06 29T172141.418

Letsupp Image 2023 06 29T172141.418

Sharad Pawar On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रिपब्लीक या वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. ( Sharad Pawar Attack On Devendra Fadanvis )  त्यानंतर पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील महिला व मुलींची स्थिती योग्य नाही. राज्यातून हजारो महिला बेपत्ता आहे. फडणवीसांनी इतर वक्तव्यं करण्याऐवजी याकडे लक्ष द्यावं, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात राज्य सरकारला सत्तेत येऊन 1 वर्ष झालं. अनेक प्रश्न सध्या राज्यासमोर आहे. यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात महिला आणि मुली यांच्यावर होणारे हल्ले ही सर्वात जास्त चिंतेची बाबा आहे. या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहे.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

पवार म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजपचे नवीन सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात राज्यात कायदा अन् सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहेत. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत, अशा माहिती त्यांनी दिली.

https://youtube.com/watch?v=6PFjW7rI7lI

राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे. राज्यात दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांची हवाली करायला हवे, असे म्हणत पवारांनी फडणवीसांना सुनावले.

शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट…

दरम्यान पवारांनी फडणवीसांच्या डबल गेम खेळल्याच्या आरोपांवर देखील उत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का ? सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही त्यांची गोष्ट समाजासमोर यावी याकरिता काही गोष्टी केल्या, असे फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version