शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट…
Sharad Pawar Speak on Uniform Civil Code : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्यावर विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समान नागरी कायद्यामध्ये शीख, जैन, ख्रिश्चन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं मत शरद पवार यांनी मांडलंय. नूकतीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत समान नागरी कायद्यावर थेट भाष्य केलं आहे.
खेळाडूंची फटकेबाजी बघता-बघता गहुंजेवर रंगणार शाह-पवारांचे राजकारण
एकाच देशात दोन कायदे कसे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यावर बोट ठेवत शरद पवारांनी भाष्य केलंय. केंद्र सरकारकडून समान नागरी कायद्याबाबतचा विषय नीती आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात देशाच्या २६ संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
Narendra Modi : लोकसभेसाठी भाजपची ‘थ्री सेक्टर’ रणनीती; स्वतः मोदींनी सांगितलं प्लॅनिंग
नीती आयोगाकडे आत्तापर्यंत 900 प्रस्ताव आणले आहेत. नीती आयोगाकडे आलेल्या प्रस्तावात नेमकं काय म्हटलंय? याचा खुलासा सरकारकडून करण्यात यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
विद्येचे माहेर घर पुणे बनलं ड्रग्सचा अड्डा; ऑर्डरसाठी केला जातो ‘Emoji’चा वापर
तसेच नीती आयोगाने समान नागरी कायद्याबाबत आलेल्या प्रस्तावाच्या खोलात जाऊनकाय सूचना आहेत हे पाहणं गरजेचं आहे. शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबद्दल काय भूमिका हे स्पष्ट करणं गरजेचं आहे.
Crime : दारु पिऊ दिले नाही… भाजप नेत्याने रागात पत्नीला घातल्या गोळ्या
माझ्या माहितीप्रमाणे शीख समाजाचं मत वेगळं आहे त्यांचा विरोध असल्याची माहिती आहे, यावर मी अधिक माहिती घेत असून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मत समजून घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=6PFjW7rI7lI
समान नागरी कायद्याबाबत सर्व काही उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधाऱ्यांकडून जनतेच लक्ष दुसरीकडे वेधण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.