विद्येचे माहेर घर पुणे बनलं ड्रग्सचा अड्डा; ऑर्डरसाठी केला जातो ‘Emoji’चा वापर
Pune : गेल्या काही वर्षापासून व्हॉट्सअॅप हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. एकमेकांना मेसेजद्वारे संवाद साधण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. अनेकदा टायपिंगचा कंटाळा आल्यामुळे इमोजीचा वापर केला जातो. पण याच इमोजीच्या सहाय्याने पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गांजा, कोकेन ,एमडीएमए, मशरुम, हेरॉईन आणि मेथ यापैकी कोणतेही ड्रग्स तुम्हाला पाठवायचे असेल तर फक्त इमोजी पाठवायचे. त्यातून तुमचे काम होते. याबाबत क्राईम विभागाचे डीसीपी अमोल झेंडे यांनी अधिक माहिती दिली आहे. गांजासाठी रनिंग नोज आणि लिवाच इमोजी वापरतात. कोकेसाठी नोज व आइसचा इमोजी वापरतात. एमडीसाठी साठी कॅप्सूल वापरतात, मशरूम साठी बटन मशरूम वापरतात हेरॉईनसाठी इंजेक्शनची इमोजी वापरतात, असे झेंडे म्हणाले. चुकीच्या कामासाठी वाढत्या इमोजीचा वापर पाहता हा जागरुक राहण्याचा भाग असून पालकांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या
गेल्या पाच महिन्यातील धक्कादायक आकडेवारी
गेल्या पाच महिन्यांमध्ये 7 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स पुण्यात सापडले आहे. 1 जानेवारी ते 25 मे 2023 दरम्यान, अंमली पदार्थ- मेफेड्रोन आणि एमडी प्रकरणी 17 गुन्हे दाखल झाले असून 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 1 किलो 700 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 3 कोटी 43 लाख एवढी आहे. ब्राऊन शुगर आणि हेरॉईन प्रकरणी 1 गुन्हा दाखल असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यात 336 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 40 लाख एवढी आहे.
कोकेन प्रकरणी 4 गुन्हे दाखल असून यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 198 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 39 लाख 75 हजार रुपये त्याची किंमत आहे. चरस प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 3 किलो 285 ग्रॅम ड्रग्ज जप्त केला असून त्याची किंमत 42 लाख 68 हजार एवढी आहे. कॅथा इडूलिस याप्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात असून 2 आरोपींना अटक केली आहे. यात 9 किलो 800 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 7 लाखांच ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामुळे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्सचे माहेर घर म्हणून ओळखले जाणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
‘देशाला स्वातंत्र्य मिळालं पण… शिंदे गटाच्या नेत्याचा भिडेंना ‘असा’ही पाठिंबा
याबाबत क्राईम विभागाचे डीसीपी अमोल झेंडे म्हणाले की, यामध्ये इयत्ता आठवीपासून पुढील विद्यार्थी, 11-12 वीचे विद्यार्थी, कॉलेजला जाणारे विदार्थी, आयटीमध्ये काम करणारे, झोपडपट्टीभागातील लोक यांना टारगेट करण्यात येत आहे. त्यामुळे आमचे लोक या भागात जाऊन जनजागृती करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा केला जातोय. पोलीस याचा शोध घेत असताना नशेडींचे हे नवे कोडवर्ड समोर आले आहे. हे कोडवर्ड डिकोड करण्याचे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे.