पवारांना मी धमकी दिली नाही; सुप्रिया सुळें अन् रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा करणार : सौरभ पिंपळकर

Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर […]

Letsupp Image   2023 06 16T172409.771

Letsupp Image 2023 06 16T172409.771

Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर हा माध्यमांच्या समोर आला असून ही धमकी मी दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे.

शरद पवारांचा दाभोळकर होईल असं ट्विट मी केलं नाही. पवारांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. या घटनेमुळे समाजात आमची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंना मानहानीची नोटीस बजावणार असल्याचे सौरभ पिंपळकरने म्हटले आहे. तसेच रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात देखील मानहानीचा दावा दाखल करणार असे पिंपळकरने म्हटले आहे.

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

मला या प्रकरणात गोवण्यात आले असून माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. धमकीशी माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले, असे पिंपळकरने म्हटले आहे. शरद पवारांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. मी असे कोणतेही ट्विट केले नाही आणि शेअरही केले नाही. त्या ट्विटला मी लाईकही केले नाही, असे स्पष्टीकरण पिंपळकरने दिले आहे.

Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?

तो पुढे म्हणाला की, ‘मी जे ट्विट केले होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कातरुण खात होता, त्याचे तोंड वाकडे होऊन गेले, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हते. पण, त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता’. दरम्यान,शरद पवारांना धमकी प्रकरणामध्ये पुण्यातून सागर बर्वे या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version