आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

Bjp-Shivsena :

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (ShivSena) वाद आता शमताना दिसत आहे. आमची जीवाभावाची मैत्री आहे. कोणी किती प्रयत्न केला तरी आमचं बाँडिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है टुटेगा नही, असं म्हणतं शिंदे यांनी वादावर पडदा टाकला. तर एखाद्या जाहिरातीने किंवा एखाद्याच्या वक्तव्याने सरकारमध्ये काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, असं म्हणतं फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं. (BJP step back on Eknath Shinde and Devendra Fadnavis advertisement controversy)

दरम्यान, हा वाद शमण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुढाकार घेतला असल्याचं दिसून येत आहे. जाहिरातीवरील वादानंतर दोन्ही पक्षातील नेते आमने-सामने येताच भाजपने सावध होऊन स्वपक्षाच्या नेत्यांना आवर घालण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती आहे. भाजपच्या नेत्यांना यापुढील काही दिवस माध्यमांपुढे राजकीय भाष्य करताना प्रदेश नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, फलक उभारण्यावर बंधने घातली आहेत. नेत्यांच्या बोलण्याने सरकार आणि भाजप-शिवसेना युतीवर परिणाम होऊन विरोधकांच्या हाती कोलीत जाऊ नये, याकरिता भाजपने कठोर पावले उचलली आहेत, असे सांगण्यात येत आहे.

Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?

जाहिरातीच्या मुद्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. त्याला शिंदे समर्थक आमदारांनीही जशास तसे उत्तर दिले. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांना थेट बेडकाची उपमा दिली. याशिवाय 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.. असं म्हणतं कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजीही करण्यात आली. या सगळ्यावर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे युतीत नव्या वादाला तोंड फुटून राजकीय परिणामांची चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

‘अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन’; सुळेंचे केसरकरांना चोख प्रत्युत्तर

मात्र यानंतर भाजपने काहीसं दोन पावलं मागे जात पक्षाच्या नेत्यांची समजूत काढून काळजी घेण्याचा पवित्रा घेतला. चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, कितीही काही झाले तरी भाजप सेना युती ही अभेद्य आहे. भाजपचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की कुणीही उतावीळपणा करू नये. कुणीही बॅनरबाजी, पोस्टरबाजी करू नये. वादग्रस्त फलक लावू नये. कुणीही प्रदेशची परवानगी घेतल्याशिवाय भाजप-शिवसेना युतीबद्दल बोलू नये.

युती टिकविणे महत्त्वाचे :

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी सध्याच्या स्थितीत युती टिकविणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ नेते असल्याने त्यांच्यात मतभेद नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube