Download App

Sharad Pawar: …म्हणून काही खेळी खेळल्या; डबल गेमच्या आरोपांवर पवारांचा पलटवार

Sharad Pawar On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रिपब्लीक या वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

फडणवीस यांनी काल स्वत: सांगितलं की, भाजपसोबत सरकार स्थापन न करण्याच मत मी दोन दिवस आधी बदललं. जर मी माझं धोरण बदललं होतं तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथ घेण्याच काय कारण होतं? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. तसेच ती शपथ जर घ्यायची होती तर ती अशी पहाटे चोरून का घेतली. शपथ घेतल्यानंतर जर माझा त्या सरकारला पाठिंबा होता तर ते सरकार तिथं राहिलं का? दोन दिवसात त्यांचे सरकार गेले. याचा सरळ अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही त्यांची गोष्ट समाजासमोर यावी याकरिता काही गोष्टी केल्या,  असे शरद पवार म्हणाले.

शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट…

पुढे पवार म्हणाले की, मी जर त्यांना फसवलं असे त्यांचे म्हणणे आहे तर तुम्ही का फसलात असा खोचक सवाल त्यांनी केला. तसेच सत्तेशिवाय ज्यांना करमत नव्हतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते तर राज्यातील नेते होते, असे म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस 

2019 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर उद्धव ठाकरे आमचा फोन घेत नव्हते. तेव्हा आम्ही दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आमची बैठकी झाली होती. त्याबैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी सरकार बनविणार याचा निर्णय झाला. त्यावेळी सरकार स्थापन करण्याची सुरुवात शरद पवार यांच्याशी बोलणी करुनच झाली होती. शरद पवारांनी आमचा उपयोग करुन स्ट्रटेजी केली आणि आमचा वापर करुन निघून गेले. त्यावेळी शरद पवारांनी आमच्याशी डबल गेम खेळला, असा आरोप फडणवीसांनी केला होता.

 

Tags

follow us