Download App

Sharad Pawar : …तर मी मोदींसाठी मैदानात उतरणार; पवारांचा मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar On PM Modi :  देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकजूट करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. काही दिवसांपूर्वी बिहाराची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षातील नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे नेते उपस्थित होते. ( Oppostion Meeting at Patana )   विरोधकांच्या या एकजुटीमध्ये शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचे काम ते करत आहे. पण आज मात्र त्यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्च सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी बोलताना,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर महिलांना संसदेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देऊ. ( Sharad Pawar On PM Modi )  तसेच याबाबत इतर विरोधी पक्षातील नेत्यांशी बोलण्याची तयारीदेखील पवारांनी दर्शवली आहे. त्यामुळे पवारांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

शरद पवार म्हणाले की, “राज्यामध्ये मी मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. महाराष्ट्राचा हा अनुभव बघितल्यानंतर हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला त्याचे आम्ही स्वागत केले. महानगरपालिकेपर्यंत आम्ही महिलांना आरक्षण देऊ शकलो. पण आता महिलांना विधीमंडळ आणि संसद याठिकाणी आरक्षण देण्याची आवशक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर या धोरणाबाबत पुढाकार घेत असतील तर आमचा याला पाठिंबा असेल, अस शरद पवारांनी म्हटले. तसेच अन्य राजकीय पक्षातील लोकांबरोबर मी चर्चा केलेली नाही, पण त्यांनादेखील या निर्णयात सहभागी करुन घेण्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे”.

https://youtube.com/watch?v=6PFjW7rI7lI

राज्यातून किती मुली बेपत्ता झाल्या? आकडेवारी सांगत पवारांनी टोचले फडणवीसांचे कान

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट होत असताना शरद पवारांनी गुगली टाकली आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. याआधी देखील पवारांनी उद्योगपती गौतम अदानींच्या भूमिकेवर काँग्रेस पक्षाशी असमहती दर्शवली होती. एकीकडे विरोधी पक्ष अदानींच्या जेपीसी चौकशीची मागणी करत असताना पवार यांनी याची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे पवारांच्या या विधानानंतर आणखी काही राजकीय खळबळ होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us