Download App

मोठी बातमी : अजित पवार यांचं ‘घड्याळ’ चिन्ह जाणार? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं

NCP Party and Symbol Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत नाही जेणेकरुन तुम्ही तुमच्या पक्षाचे कामकाज शांततेने आणि तणावाशिवाय करू शकता? निवडणुकीदरम्यान तुम्ही ते चिन्ह वापरणे सुरू ठेवू शकता अशी विचारणा केली.  (ncp-crisis-supreme-court-hearing-Ajit Pawar use a symbol other than the ‘clock’ symbol for elections)

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अजित पवार आमच्या लोकप्रियतेचा वापर करत आहेत असा दावा शरद पवार गटाने केला. फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही आक्षेप घेण्यात आला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव वापरू नका असे निर्देश दिले. तसेच याच सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्हा का घेऊ शकत नाहीत. त्या चिन्हाचा वापर तुम्ही आगामी निवडणुकीतही करू शकता, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली. तसेच काही गोंधळ होणार नाही यासाठी अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह वापरावे असेही न्यायालयाने सुचवले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 मार्च रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा सवाल अजित पवार गटासाठी धक्काच मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ही विचारणा झाल्याचे स्पष्ट होत आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. या सुनावणी त्यांनी अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात, ही फसवणूक आहे. शरद पवार गटाच्या लोकप्रियतेचा वापर का केला जात आहे असा सवाल करत सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्स न्यायालयात दाखवले.

ग्रामीण भागात घड्याळ चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात हे पोस्टर कायम ठेवा. शरद पवार यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी देऊ नका अशी मागणी सिंघवी यांनी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि घड्याळ चिन्ह वापरणार नाही, असं लेखी द्या असे निर्देश अजित पवार गटाला दिले. यानंतर अजित पवार गटाने आम्ही शनिवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करू असे स्पष्ट केले.

follow us