मोठी बातमी, संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बजावली नोटीस

Sangram Jagtap :  दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असा वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची

Sangram Jagtap

Sangram Jagtap

Sangram Jagtap :  दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांना नोटीस बजावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पक्ष संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती. तर आता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे.

आमदार जगताप (Sangram Jagtap) यांनी सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केला होता. या वक्तव्यासंदर्भात आता खुलासा करण्यात यावा यासाठी आमदार जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार ?

पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतरही पक्षाच्या विचारधारेपासून कोणताही खासदार- आमदार किंवा पक्षाशी संबंधित जबाबदार व्यक्ती, अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल तर ते पक्षाला मान्य नाही. अरुणकाक जगताप हयात होते तोपर्यंत तेथे सर्व काही सुरळीत होते. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागले, बोलले पाहिजे. मी संग्राम जगताप यांना समज दिली होती. त्यावर सुधारणा करेन असेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही सुधारणा दिसत नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असं माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते.

नॅट सायव्हर-ब्रंटने रचला इतिहास; महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू

काय म्हणाले होते आमदार जगताप?

सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत असं सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले होते.

 

 

Exit mobile version