वडिलांच छत्र नाही, पण तो सुधारत नाही, कारणे दाखवा नोटीस पाठवणार; जगतापांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार भडकले

Ajit Pawar on Sangram Jagtap अजित पवार जगतापांच्या विधानावरून संतापल्याचं पाहायला मिळालं तसेच त्यांनी कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar Angry on NCP MLA Sangram Jagtap for his statement about Diwali shopping : अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात आता अजित पवार संग्राम जगतापांच्या विधानावरून त्यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं तसेच त्यांनी जगतापांवर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, संग्राम जगतापा यांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. त्याच्यावर जबाबदार वाढली आहे. वडिलांच छत्र राहीलं नाही, पण तो सुधारत नाही. त्याची भूमिका पक्षाला मान्य नाही. असं म्हणत अजित पवार संग्राम जगतापांच्या विधानावरून त्यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले संग्राम जगताप?

अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. (AIMIM) या सभेत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान, आज करमाळा येथील हिंद जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांनी कालच्या सभेतील आरोपांवर जोरदार पलटवार केलाय.

ब्रेकिंग! 1 जुलैनंतर नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क नाही, प्रशासनाचा मोठा निर्णय

दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

follow us