Download App

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Sushma Andhare :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना बोलताना चांगलेच सुनावले आहे. सुषमा अंधारे यांनी काही दिवासंपूर्वी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांची तक्रार शरद पवारांकडे केली होती. माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होते त्यावर विधानसभेत त्यांनी आवाज उठवला नसल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. यावेळी शरद पवारांसमोर त्यांना अश्रू अनावर झाले. यावर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे या कुठल्या गटात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे या ठाकरे गटात आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघत आहे, ज्या पक्षासाठी काकारे, बाबारे, मामारे करत आहे आणि सभा घेत आहे. त्यांनी एवढा अजित पवारांचा उल्लेख करण्यापेक्षा ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगायला पाहिजे, अशा शब्दामध्ये अजितदादांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे.

तसेच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला जेवढा अधिकार तेवढाच विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना सांगा इथं रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे रडल्या असता तर जास्त योग्य ठरलं असतं, असा टोला देखील अजितदादांनी त्यांना लगावला आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. आधीच्या काळातील राजकारण्यांची बात काही और होती. अटल बिहारी वाजपेयी आणि आताच्या काळातील नेते यांच्यात जमीन -अस्मानाचा फरक आहे, असे सांगत आता नैतिकतेच्या आधारावर कोणीही पायउतार होणार नाही , असे पवार म्हणाले. शिंदे फडणवीस राजीानामा देतील असा विचारही करू नका, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us