मोठी बातमी : शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी; राष्ट्रवादीचे 8 आमदारही शपथबद्ध

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये एन्ट्री घेतली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, […]

Ajit Pawar Oath

Ajit Pawar Oath

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये एन्ट्री घेतली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (NCP Leader Ajit Pawar took oath as DCM in shinde government along with 8 mla)

राज्यात आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना सुरुवात झाली होती. अजित पवार यांनी आज सकाळी देवगिरी या बंगल्यावर समर्थक आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार तातडीने राजभवनाकडे रवाना झाले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेतेही राजभवनावर उपस्थित होते.

यानंतर पार पडलेल्या शपथविधीसोहळ्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शपथ घेतली. अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. यात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

राऊतांची जोरदार टीका :

दरम्यान, अजित पवार यांच्या या भूमिकेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे राहु, होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट राऊतांनी केलं.

Exit mobile version