‘धन्य ते हास्यसम्राट’.. राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

Amol Mitkari on  Raj Thackeray Speech : काल दादरमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच सध्याच्या राजकारणावर भाष्य करत राजकीय नेत्यांनी राजकारणाचा बटट्याबोळ करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. भाषणात राज ठाकरेंनी 6 जून रोजी रायगडावर जाणार […]

RAJ THACKERAY 1

RAJ THACKERAY 1

Amol Mitkari on  Raj Thackeray Speech : काल दादरमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच सध्याच्या राजकारणावर भाष्य करत राजकीय नेत्यांनी राजकारणाचा बटट्याबोळ करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. भाषणात राज ठाकरेंनी 6 जून रोजी रायगडावर जाणार असल्याचे सांगितले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक टोला लगाववला आहे.

हे वाचा : राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा..

राज ठाकरेंच्या मेळाव्यातील भाषणाची मिटकरी यांनी खिल्ली उडविली आहे. धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसलेले हास्यसम्राट 6 जूनला रायगड जाणार असं समजलं. पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का ? कसं आहे, गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली.

शिवधनुष्य बाळासाहेबांनाच पेलवले, एकाला तर झेपलेच नाही; चिन्हाच्या वादावर राज ठाकरे बोलले..

दरम्यान, राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटानेही त्यांच्या कालच्या भाषणावर जोरदार प्रहार केला आहे. मुळात शिळ्या कढीला आलेला हा ऊत दिसतोय. 20 ते 25 वर्षांनंतर हे साक्षात्कार बाहेर येत आहेत. सर्वांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांची कोंडी केल्याचे दिसत आहे. त्यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण चालूच शकत नाही, असेच दिसत असल्याचे ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

 

Exit mobile version