राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा…
मुंबई : मुंबईतील माहीम समुद्रातल्या अनिधकृत बांधकामावर प्रशासनाने बेधडक कारवाई सुरु केली आहे. इथलं अतिक्रमण पाडण्याचं काम आज सकाळपासून सुरु करण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक नियुक्त करण्यात आलं आहे.
काळजी घ्या! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय…
दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत राज ठाकरे यांनी या अनधिकृत बांधकामाबाबत एक व्हिडिओच दाखवला होता. व्हिडिओ दाखवल्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडलं नाहीतर त्या ठिकाणी गणपतीचं बांधणार असल्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी प्रशासनाला दिला होता.
Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या आधी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत आहे.
अखेर राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली आहे. या भागात कर्मचाऱ्यांचं पथक कारवाईसाठी दाखल झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, माहीम समुद्रात दर्गा बांधण्यात आली असून या दर्गाचं बांधकाम अनिधकृत असल्याचा दावा राज ठाकरेंनी भर सभेत केला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. या कारवाईसाठी माहीम समुद्र भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.