Download App

अहमदनगर नामांतराच्या निर्णयाच स्वागत पण… जयंत पाटलांची टोलेबाजी

Ahmednagar name change : अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केलीय. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, या शब्दांत जयंत पाटलांना टोला लगावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच घमासान पेटलं आहे.

विश्वास नसेल तर रुग्णालयात काम करुन काय फायदा? डॉ. तात्याराव लहानेंचा सवाल

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत या दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा जरी पुढे केला असला तरी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असंही ते यावेळी म्हणालेत. भाजपचा अलीकडे प्रॉब्लेम झालं की, अनेक लोक राष्ट्रवादीतून तिकडे गेलेले आहेत.

‘राजवाडा’ शब्दावरून पुण्यात राडा; भाजपला भिडायला निघालेल्या काँग्रेसच्या मावळ्यांना पोलिसांनी अडवलं

त्यामुळे निष्ठावंत कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेल्या लोकांना कुठं बसवायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तो त्यांता अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपतं जी लोकं गेलीत. या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटलांनी दिल्लीत महिला कुस्तीपटूंचं सुरु असेलल्या आंदोलनावरही सडेतोड भाष्य करीत विरोधकांना सुनावलं आहे. पाटील म्हणाले, जगात ज्या महिलांनी नाव कमावलं. पदक मिळवलं त्यांना खाली रस्त्यावर पाडणं पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणं, याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करते. एका बाजूला संसदेचं उदघाटन करता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन चिरडता संसद उदघाटन सुरु असताना आंदोलन चिरडलं तरी मीडिया दाखवणार नाही यासाठी हे खटाटोप केले गेले. पण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय भाजपने स्वतःहून कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असल्याचं त्यांनी म्हटलंय.

तसेच नामांतराच्या मुद्द्यावर वक्तव्य करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नामांतराच्या मुद्द्याचं राजकारण करु नये, अशा इशाराच दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण नामांतर आम्ही केलं, असं भासवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. नामांतराच्या मुद्द्याचं राजकारण कुणीही करु नये, असं पवार म्हणाले आहेत.

Tags

follow us