Download App

मी काय तेव्हा गृहमंत्री होतो?; परमबीर सिंग यांच्या आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा काय गृहमंत्री होतो का?, असा सवाल पाटील यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : काही दिवसांपूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केलं होते. देशमुख यांच्याशिवाय शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरही त्यांनी आरोप केले. जयंत पाटील यांनी राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप सिंग यांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

Ground Zero : महाडिक संपणार की टिकणार? कोल्हापुरात पुन्हा दिसणार ‘राजकीय थरार’ 

देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा काय गृहमंत्री होतो का?, असा सवाल पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता ते म्हणाले, मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते काय बोलत आहेत या विषयी मला जरा देखी माहिती नाही. परमबीर यांना सांगायला माझा काय संबंध येतो. मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा काय गृहमंत्री होतो का? त्यांची आणि माझी फार कमी वेळा भेट झालीय. मी त्यांना असं का सांगू, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

भारीच, 10 मिनिटांत घर पोहोच मिळणार पासपोर्ट फोटो, Blinkit करणार मदत ; जाणून घ्या खर्च 

पार्टीने वसुलीच टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. पक्ष कधीच कोणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली? आरोप होऊन किती वर्षे उलटली, 3 वर्षांनंतर काही गोष्टी सांगत असतील तर त्याकडे किती लक्ष द्यायचं, फक्त परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे, ती व्यवस्थित व्हाावी, हीच अपेक्षा आहे, असं पाटील म्हणाले.

राज ठाकरेंना गांभीर्याने घ्यायची गरज नाही…
राज ठाकरेंनी जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मनोज जरांगे स्वतंत्र विचारांनी काम करतात. ते कोणाचं ऐकत नाहीत. सल्ला मानून काम करत नाहीत. मला वाटतं यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा त्जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गुजरातमध्ये काही जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सरकार ते प्रकल्प थांबवू शकणार नाहीत, आमचे अनेक याआधी देखील प्रकल्प तिकडे गेलेत. ते जात असताना आमच्या सरकारने कधीच थांबवले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

follow us