CAT ने निलंबन रद्द केलंय, परमबीर सिंग यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले…
Central Administrative Tribunal ने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन रद्द केलंय, त्याचं निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत असल्याचं उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
परमबीर सिंग यांच्याबाबत सुरु असलेली विभागीय चौकशीदेखील चुकीची असल्याचं CAT ने निकालात म्हटलं आहे. त्यामुळे CAT च्या निर्णयानूसार परमबीर सिंग यांची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
CAT च्या निकालामध्ये परमबीर सिंग यांच्या निलंबनाला चुकीचं ठरवण्यात आलं आहे, तसेच निलंबनाचा आदेश मागे घेण्याबाबत विनंतीही करण्यात आली. त्यानूसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला
दरम्यान, CAT च्या निर्णयामध्ये परमबीर सिंग यांची चौकशी बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावरील निलंबन रद्द करण्यात आलंय. याच निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
Sanajay Raut : मोदींप्रमाणे लोक फडणवीसांच्या डिग्रीवरही संशय घेतील, सामनातून टीकास्त्र
परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणलं होतं.
दरम्यान, राज्य सरकारकडून परमबीर सिंग यांचं निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातील विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे.