Ground Zero : महाडिक संपणार की टिकणार? कोल्हापुरात पुन्हा दिसणार ‘राजकीय थरार’
एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला, निर्मात्याला, लेखकाला राजकीय सिनेमा काढू वाटावा असा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण. या मतदारसंघातील राजकीय थरारपट आहे. राजकारणासाठी लागणारं सारं काही आहे. दोन कुटुंबांमधली तेढ, जीवापाड मैत्रीचं आणि नंतर ‘पाडापाडीच्या’ राजकीय वैरात झालेलं रूपांतर, राजकारणातले कुटील डाव, पक्षाबिक्षाच्या पलिकडच्या व्यक्ती आणि त्यांच्या गटांचं समीकरण. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राजकीय पक्षांना किंवा जातीपातीच्या राजकारणाला अर्थ नाही. इथं सगळा मामला म्हणजे महाडिक विरूद्ध पाटील. यात पात्र बदलली. पण गट तेच राहिले. मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये हेच चित्र बघायला मिळालं. आता यंदाही हेच चित्र बघायला मिळणार हे नक्की आहे. (Will there be a fight between Congress’ Rituraj Patil and BJP’s Shaumika Mahadik in Kolhapur South Assembly Constituency?)
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये पाहुया ‘दक्षिणेच्या राजकारणाचा उत्तरार्ध…’
महाडिक विरूद्ध पाटील अशी या मतदारसंघाची ओळख. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सतेज पाटील (Satel Patil) यांनी करवीरसोडून दक्षिणेमधून (Kolhapur South Assembly Constituency) निवडणूक लढवायाचं ठरवलं आणि तेव्हापासूनच महाडिक विरुद्ध पाटील हे समीकरण फिक्स झालं. या काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा प्रत्येक निवडणुकीत पाटील विरुद्ध महाडिक हा वाद बघायला मिळाला. या वादावर एक स्वतंत्र व्हिडिओ नाही तर अख्खा चित्रपट होऊ शकतो. त्यामुळे आपण विधानसभेवर फोकस ठेऊ.
2009 मध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यात पाटील यांची सरशी झाली. 2014 मध्ये अमल महाडिक (Amal Mahadik) विरुद्ध सतेज यांच्यात महाडिकांनी मैदान मारलं. तर 2019 मध्ये पुन्हा ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यांच्यात पाटलांनी बाजी मारली. यानंतर या विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी विकासकामे, लोकसंपर्क आणि संघटन बांधणी यातून मतदारसंघावर आपली पकड पक्की केली. भाजपला अगदी अस्तित्वहीनच करुन ठेवली. ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची सरशी झाली. त्यामुळे भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ होते.
Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?
पण 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आणि कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिकरण डोकं वर काढू लागलं. अशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा एकदा अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यांनी शहरी भागातील आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांची मोट बांधली. मेळावे आणि घरोघरी संपर्क केला. काँग्रेसकडे असणाऱ्या या मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठे मताधिक्य मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना केवळ सहाच हजार मताधिक्यच मिळवता आले.
अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?
या तुलनेत करवीर, राधानगरी, चंदगड आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिक मताधिक्य मिळाले. ही बाब काँग्रेस नेतृत्वाला विचार करायला लावणारी आहे. तर भाजपला आशा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी काँग्रेसला मताधिक्य मिळाले असले तरी भाजपलाही विधानसभेची संधी मिळाली असल्याचे दिसून येते. यंदा येथे भाजपकडून अमोल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांचे तिकीट फिक्स मानले जात आहे. सतेज पाटील यांनी जिल्ह्य़ात काँग्रेसला दिलेल्या नवसंजीवनीने हायकमांडकडून त्यांना दुखावले जाण्याची शक्यता अगदी ना के बराबरच आहे.