Download App

ते लोक होळकरांसोबत आले, ही खुप मोठी प्रथा आहे; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशावर आव्हाडांचे विधान

Jitendra Awhad On Triymbakeshwar Temple :  त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावर आता राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.

आम्ही बोललो की त्याला वेगवेगळे रंग लावले जातात. महाराष्ट्राच्या काही प्रथा आहेत, परंपरा आहेत. अनेक गावांमध्ये पीर हे कुलदैवत, ग्रामदैवत म्हणून मानलं जातं. त्र्यंबकेश्वरमध्ये जे फुल विक्रेते आहेत, ते अहिल्याबाई होळकरांच्या काळापासून तिथे आले आहेत. त्याठिकाणी ते फुल विकण्याचा व्यवसाय करतात. संदलच्या दिवशी ती मंडळी फुलं घेतात व त्र्यंबकेश्वराच्या पायरीवर ठेवून नतमस्तक होतात. आमचं जे पोट आहे ते त्र्यंबकेश्वरामुळे आहे, एवढंच ते करतात. ते काही मंदिराच्या आत जात नाहीत, असे आव्हाड म्हणाले आहेत.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यावर मी काय बोलणार. मी काही बोललो की हिंदु- मुसलमान करतात. होळकरांच्या काळापासून ही मंडळी इथे आली आहेत. त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. तेव्हापासून ती लोक हा व्यवसाय करत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. ही खुप मोठी प्रथा आहे. भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास थोडा तरी समजून घ्या, असे आव्हाडांनी सुनावले आहे.

TDM Movie: अखेर भाऊ कऱ्हाडेच्या अश्रुंना मिळणार न्याय; TDM ‘या’ तारखेला होणार नव्याने प्रदर्शित

दरम्यान, आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर द्वारातून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता मंदिराच्या परिसरात सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले आहे.

Tags

follow us