TDM Movie: अखेर भाऊ कऱ्हाडेच्या अश्रुंना मिळणार न्याय; TDM ‘या’ तारखेला होणार नव्याने प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T120122.942

TDM ,marathi movie new release date: ‘TDM’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवस प्रचंड चर्चेत असलेला ‘टिडिएम’ आता लवकरच पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा सिनेमा (Cinema) सध्या जोरदार चर्चेत आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल (TDM trailer viral) झाला आणि चाहत्यांना त्या सिनेमाचे मोठे वेड लागले होते. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या टीडीएमला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या सिनेमाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्याने नाईलाजाने या सिनेमाचे प्रदर्शन थांबवावं लागलं होतं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली होती.

तसेच याबाबत बोलत असताना दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे भावुक देखील झाले होते. या सिनेमाला एवढी मेहनत घेऊनही केवळ सिनेमाला स्क्रीन न मिळाल्याने सिनेमा बाहेर काढावा लागला, म्हणून कलाकार अक्षरशः रडले होते. यानंतर हे प्रकरण जोरदार पेटला होता. पुण्यात या सिनेमाच्या समर्थनार्थ चक्क भव्य मोर्चा देखील काढला होता. अगदी लोकांनी हा सिनेमा प्रदर्शित व्हावा म्हणून मोठी मोहिमच हाती घेतली होती. अगदी सरकार दरबारी देखील त्याची दखल घ्यावी लागली. अखेर हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.

या संदर्भात भाऊराव कऱ्हाडे म्हणतात, ”नमस्कार रसिकप्रेक्षकहो,
#ISupportTDM मोहीम उत्स्फुर्त पणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.”
”आपल्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळाली आहे आणि याच उमेदीने आम्ही ‘टीडीएम’ सिनेमा पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत…’

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

‘टीडीएम’ च्या प्रवासाला पुन्हा सुरवात होत आहे … ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘#टीडीएम’ प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्वांचे उदंड प्रेम मिळेल याची खात्री आहे…
तेव्हा भेटूया थेटरात… ९ जून ला…” या पोस्टनंतर आता चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. सर्वजण आता 9 जून वाट बघत आहेत. याची माहिती दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

Tags

follow us