Download App

आपण नेमकं लोकशाहीत राहत आहोत का?; बारसू रिफायनरीवरुन आव्हाडांचा संताप

 Jitendra Awhad On Barasu Refinery  :  राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

बारसू सोलगाव ही जागा सरकारने रिफायनरी साठी शोधली आहे. पण त्या पंचक्रोशीतील सगळ्या जणांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मच्छीमारी होते.  छोट्या बोटीतून ताजी मच्छी आणली जाते आणि तिथून तो व्यवसाय केला जातो. त्या ठिकाणी छोटे स्थानिक शेतकरी आहेत. या प्रकल्पामुळे  जेवढे ग्रामस्थ बाधित होतात , त्यापैकी सगळ्या ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध केला आहे, असे ते म्हणाले आहेत.

‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

आता शंभर टक्के लोकांचा विरोध असताना  जबरदस्तीने रिफायनरी किंवा उद्योग तिथे आणायचा हे चुकीच आहे.  ज्या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जात आहे , कोणावर गुन्हे दाखल केले जात आहेत , कोणावर अतिरेकी असल्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. एटीएस तर्फे चौकशी केली जात आहे. हे काय आहे कळत नाही आहे मला? पत्रकारांना हात धरून बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं इथे परत दिसू पण नका. म्हणजे आपण कुठल्या राज्यव्यवस्थेत राहत आहोत.  आपण नेमकं लोकशाहीत राहत आहोत का? काय चालू आहे? असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

आता रिफायनरी आल्यावर या जमिनीचा भाव प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे आधीच प्लॅनिंग करून लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. परवा रात्रीपासून आणि काल सकाळपासून तिथले चार ते पाच हजार स्थानिक शेतकरी माळ रानावर येऊन बसले आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही इथून उठणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी.  सरकार म्हणजे महाराष्ट्राचा मालक नाही आहे, अशा शब्दात आव्हाडांनी सरकारला सुनावले आहे.

Tags

follow us