Download App

खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar On Shinde Goverment :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

खारघर येथील मृत्यूमुखी पडलेल्या घटनेला सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गर्दी जमवून वातावरण अनुकूल करण्याचा सरकारचा डाव होता. खारघर येथील घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी याची मागणी शरद पवारांनी केली आहे. पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी का काळजी घेतली गेली नाही असा सवाल शरद पवार यांनी केला.

जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी

अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला एवढी गर्दी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण…

सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामामध्ये 40 लोकांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोपही पवारांनी केला आहे.  राज्यात महागाई, बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न आहेत. त्यावर सरकार दुर्लक्ष करत आहेत. तसेच केंद्रीय संस्थांच्या मार्फत विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणला जात आहे. अनिल देशमुख, संजय राऊत यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केल्या जात आहेत.

 

Tags

follow us