जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी

Untitled Design   2023 04 21T174339.919

Supriya Sule : मुंबईशी आपलं नातं काय ? यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गाण्याच्या सुरात काही आठवणींना उजाळा दिला. जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान.. असे म्हणत मुंबई विषयी असलेला जिव्हाळा यावेळी सुळे यांनी बोलून दाखवला. तसेच मुंबईचा माणूस घडाळ्याकडे बघत असतो, घडाळ्याच्या काट्यावर त्याचं आयुष्य चालतं. परंतु आता हाच परिणाम पुढच्या निवडणुकीतही दिसला पाहिजे. त्याने नुसतं घडाळ्याला पाहायचं नाही तर घडाळ्याचं बटनही दाबायचं असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज घाटकोपरमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई आणि मुंबईकरांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. मुंबईने काय काय दिलं हे सांगत असताना त्या अनेक जुन्या आठवणीतही रमल्या.

सुळे बोलताना म्हणाल्या, जगातून कुठूनही आलात तरी मुंबई त्याला पोटात घेते. मनाने खूप मोठी आहे ही मुबंई. संपूर्ण देशातून तुम्ही कुठेही मुंबईत फिरला तरी तुमचा गाववाला भेटतोच. आपल्याला सगळ्यांना या मुंबईने खूप काही दिलंय. जरा हटके, जरा बचके ये है मुंबई मेरी जान”, असं म्हणत त्यांनी मुंबई शहराचं तोंड भरून कौतुक केलं.

आम्ही १९७१ साली मुंबईत आलो. आम्ही मुंबईचे ओरिजनल नाही. जवळपास ५० वर्षे झाली आम्ही येथेच राहतो. या शहराने आम्हाला काय नाही दिलं? शिक्षण, आरोग्य, सुख-सुविधा दिलं. नवराही मुंबईमध्येच भेटला आणि पोरंही मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये झाली. आयुष्यातील सर्वकाही मुंबईने दिलं आहे. या लोकांचे ऋणानुबंध मी कधीच विसरणार नाही,” असं सांगत सुप्रिया सुळे आठवणीत रमल्या.

एकदा मुंबईत राहिलं की दुसरी कुठे नाही राहत येत बाबा. एकदा मुंबईत राहायची सवय लागली तरी गावी गेल्यावर चार-पाच दिवसांतच अस्वस्थता वाटायला लागतं. गावी आराम केला, आता मुंबईच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात जाऊया, असं वाटत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पटनातील जामा मशिदीबाहेर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स झालं तेव्हा शरद पवार हें राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी जेव्हा हा प्रस्ताव सादर केला. तेव्हा सर्वांनी विरोध केला होता. तेव्हा ओरड झाली की पवार यांनी मुंबई विकायला काढली आहे, असा आरोप करण्यात आला होता. मृणालताईंनी तेव्हा मोठं आंदोलनही केलं होतं. पण बीकेसीकडे अभिमानाने पाहिलं जातं. आज सर्वं ऑफिस बीकेसीत आहेत”, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीने मुंबई-पुण्यासाठी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube