ब्रेकिंग : मविआच्या उमेदवाराची माघार; सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती

ब्रेकिंग : मविआच्या उमेदवाराची माघार; सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती 

  • Written By: Published:
Sachin Ahir

Sachin Ahir : विधान परिषदेच्या उपसभापती शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांना लॉटरी लागली आहे. मविआच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सचिन अहिर यांची विधान परिषदेचे नवे उपसभापती म्हणून बिनविरोध म्हणून निवड झाली आहे. विधान परिषदेतील उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अहिर विरूद्ध अभ्यंकर होती लढत

विधान परिषदेतील उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेतील आकडेवारी पाहता महायुतीचे एकतर्फी विजय झाला असता. परंतु तरी देखील मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड व्हावी. त्यामुळे उमेदवारीचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाली

सचिन अहिर नेमके कोण?

– सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
– विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
– वरळीमधून 1999, 2004 ,2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
– 2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
– 26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
– 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी
– 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
– 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
– 30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

वरळीत ठाकरेंना फटका बसणार?

सचिन अहिर हे मुंबईतील ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू करून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर ठाकरे गटासोबत राहिले. कामगार संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईतील संघटनात्मक राजकारणात त्यांचा प्रभाव असल्याने त्यांचे जाणे ठाकरे गटासाठी केवळ संख्यात्मक नाही, तर संघटनात्मक नुकसान मानले जात आहे. अहिर शिंदे गटात गेल्याने वरळी आणि दक्षिण-मध्य मुंबईतील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता असून, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या राजकीय हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

follow us