पटनातील जामा मशिदीबाहेर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा
Atique Ahmad Patna Jama Masjid : गेल्या काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदची हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूनंतर बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पटना येथील रेल्वे जंक्शनजवळ अतिकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर रईस अन्सारी नावाच्या व्यक्तीने घोषणाबाजी केली असल्याचे समजते आहे.
पटनात शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीबाहेर अतिक अहमद अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. राजधानी पटना रेल्वे स्थानकाजवळील प्रसिद्ध जामा मशिदीबाहेर शुक्रवारी हा सर्व प्रकार घडला. येथे लोकांनी प्रथम शुक्रवारची नमाज अदा केली आणि नंतर बाहेर येताच अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शेकडो मुस्लिमांचा जमाव रस्त्यावर जमलेला दिसला.
रईस अन्सारचे दुकान पटना जंक्शनजवळ असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. रईस अन्सारी म्हणाला की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक आणि अशरफ यांची योजना आखून हत्या केली. अतिक अहमद शहीद झाले आहेत आणि. संपूर्ण जगाच्या नजरेत ते शहीद आहेत.
नेमकं काय घडलं होत?
कुख्यात गुंड अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना 15 एप्रिल रोजी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. फिरत असताना पत्रकार त्यांना विचारपूस करत होते, त्याच दरम्यान तीन हल्लेखोरांनी पोलिसांच्या संरक्षणात अतिक आणि अशरफ यांची हत्या केली. या दोघांवर अरुण मौर्य, लवलेश तिवारी आणि सनी नावाच्या तरुणांनी हल्ला केला. हत्येनंतर तिघांनीही आत्मसमर्पण केले.
अतिक अहमदची पत्नी लपली तरी कोठे? पोलिसांना शोधूनही सापडेना
लवलेश बांदा येथील रहिवासी आहे, अरुण कासगंजचा रहिवासी आहे आणि सनी हमीरपूरचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग हेही गोळीबारात जखमी झाले आहेत. तिन्ही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत नैनी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. आतिकचा मुलगा अली हाही याच कारागृहात बंद आहे.