अतिक अहमदची पत्नी लपली तरी कोठे? पोलिसांना शोधूनही सापडेना

Untitled Design   2023 04 21T155727.682

Atiq Ahamed Case : हत्या झालेल्या गुंड अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन हिच्या संभाव्य हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, प्रयागराज पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबत प्रयागराजच्या सीमेवरील गंगा कचर परिसरात मोठ्या प्रमाणात घरोघरी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान गावांमधील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शाईस्ता आणि इतर दोघांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर भेरेटा भागातून शोध मोहीम सुरू करण्यात आली. तसेच गेल्या 20 दिवसांत कमीतकमी तीन वेळा शाइस्ताच्या हालचालींचा पोलिसांनी मागोवा घेतला होता, परंतु तिने काही मिनिटांत पोलिसांना गुंगारा दिला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही शाईस्ताला पकडण्यासाठी एक नवीन रणनीती आखली आहे. ती वारंवार आपले लपण्याचे ठिकाण बदलत आहे. ती मोबाईलचा वापर टाळत आहे आणि कथितपणे पोलिसांपासून दूर जाण्यासाठी महिलांच्या एका गटाने तिला पाठिंबा दिला आहे.

तिला पकडण्यासाठी आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहे. 24 फेब्रुवारी रोजी वकील उमेश पाल आणि त्याच्या दोन बंदूकधाऱ्यांच्या हत्येशी संबंधित एफआयआरमध्ये तिचा पती अतिक अहमद, मुलगा आणि इतरांची नावे आल्यापासून शाइस्ता फरार आहे.

“अजित पवार म्हणजे एक स्वीट डिश, गोड माणूस…” संजय राऊत यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

या महिन्याच्या सुरुवातीला प्रयागराजच्या न्यायालयाने शाइस्ताचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, “एफआयआरमध्ये तिचे नाव आरोपी म्हणून आहे. तिच्यावर तीन जणांच्या हत्येचा आरोप आहे आणि एफआयआरमध्येच तिची भूमिका नमूद करण्यात आली आहे.

गोध्रा केसप्रकरणातील आठ दोषींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

मार्चमध्ये, शाइस्ता आणि तिचा मुलगा अली अहमद यांच्यासह इतर दोघांवर आधार कार्डशी संबंधित फसवणूक केल्याचा आरोप होता. त्यांनी वेगवेगळ्या नावे आणि पत्त्यांसह दोन आधार कार्डे मिळवली होती परंतु दोन्हीवर अलीचे फोटो आहेत. त्याच्या एका जवळच्या सहकाऱ्याला पोलीस कोठडीत घेतल्यानंतर अतिकच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीतून दोन्ही ओळखपत्रे जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube