“अजित पवार म्हणजे एक स्वीट डिश, गोड माणूस…” संजय राऊत यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

  • Written By: Published:
“अजित पवार म्हणजे एक स्वीट डिश, गोड माणूस…” संजय राऊत यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. त्यावर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार आणि आम्ही काही दिवसापूर्वी सोबत जेवलो आहे. ते एक गोड माणूस आहे. ते स्वतः एक एक स्वीट डिश आहे. त्यांचा आणि माझा कोणताही वाद नाही. शिवाय पवार कुटुंबियामधील कोणत्याही घटकाशी माझा वाद नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

ते पुढे म्हणाले की, “अजित पवार हे महाविकास आघाडीचा प्रमुख स्तंभ आणि प्रमुख नेते आहेत. भारतीय जनता पक्ष जर यात लावालाव्या करत असेल तर त्यांचा डाव यशस्वी होणार नाही.”

संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

सध्या राज्यभरात खारघर हा प्रमुख विषय आहे. या प्रकरणात अजित पवार म्हणतात न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे तर ती झाली पाहिजे. नाना पटोले म्हणतात विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे तर तेही बोलावले पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत यांनी यावेळी घेतली.

नक्की वाद काय होता?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत टीका केली होती.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

अजितदादांच्या त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तरही दिले होते. संजय राऊत म्हणाले की, गेली 45 वर्ष झाली मी पत्रकारीतेत आहे. त्यामुळे मला माहिती आहे काय लिहियाचे? काय कोट करायचे? शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे अशा सगळ्या नेत्यांना मी कोट करतो. मी बरोबर बोललो, बरोबर लिहिले आहे. मी कधीही माझ्या विधानापासून माघार घेतली नाही. मी काय चुकीचे बोललो ते त्यांच्या पक्षाकडून कोणीतरी येऊन सांगावं. अजितदादांनी सिध्द करावं मी काय चुकीचे बोललो. पवारसाहेबांशी यावर चर्चा करावी, असे अवाहन संजय राऊत यांनी अजित पवार यांना केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube