Sharad Pawar On Eknath Khadase : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यातील व देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपले सहकारी एकनाथ खडसे हे आधी भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या जावई गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना जामीन मिळत नाही. त्यांच्यासोबत जेलमध्ये असणाऱ्या लोकांकडून असे कळाले आहे की, जर लवकरच त्यांना जामीन मिळाला नाही तर ते आत्महत्या करतील, असे शरद पवारांनी सांगितले आहे.
म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला एवढी गर्दी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण…
शरद पवारांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयावर भोसरी खंडातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी खारघर येथील दुर्घटनेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी
खारघर येथील मृत्यूमुखी पडलेल्या घटनेला सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गर्दी जमवून वातावरण अनुकूल करण्याचा सरकारचा डाव होता. खारघर येथील घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी याची मागणी शरद पवारांनी केली आहे.