NCP New Chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण निवृत्त होणार असे जाहीर करुन टाकले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी काल आपला निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांची नावे आहेत. या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती काल पवारांनी दिली आहे.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहेत. त्यात आता शरद पवारांकडून अध्यक्षपदासाठी दोन नावे समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नेते, उद्योजक यांचे त्यांना फोन आल्याची माहिती आहे. पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास, त्यांच्याकडून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवल्याची माहिती आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पवारांचे मूळगाव असलेल्या काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या नावाला पसंती मिळते आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या कार्याध्यक्ष हे पद नाही आहे. त्यामुळे शरद पवार हे जर आपल्या निर्णयावर कायम राहिल्यास त्या पदावर सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागू शकते.
NCP New Chief : काटेवाडीत अजितदादांचीच चर्चा; मात्र शरद पवारांच्या मनात ‘ही’ दोन नावे
दरम्यान, शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. काल संध्याकाळी वाय. बी. सेंटरवर अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, व अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यानंतर काही वेळाने सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते.