मार्केटमध्ये खणखणीत नाण्याची चर्चा होतेचं; अजितदादांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Supriya Sule On Ajit Pawar :  गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. . मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. तर मी आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T154048.016

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 18T154048.016

Supriya Sule On Ajit Pawar :  गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. . मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. तर मी आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे, असे पवार म्हणाले आहेत. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अफवांना विराम ! मी राष्ट्रवादीमध्येच राहणार, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणीही नाराज नाही. मी सर्व आमदारांशी बोलतीये. आदरणीय शरद पवार,  अजितदादा, जयंत पाटील सगळे नेते 24 तास अवेलेबल असतात. कोणी नाराज असेल तर मी त्यांच्याशी बोलेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच अजित पवारांविषयीच्या चर्चांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. जे नाणं मार्केटमध्ये खणखणीत वाजतं त्याबद्दलच चर्चा केली जाते, असेही त्या म्हणाल्या आहेत.

अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणीही काळजी करु नये. आम्ही सर्वजण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आजवर पक्षामध्ये अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. पक्षातच राहणार आहोत बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार म्हणाले.

Exit mobile version