अफवांना विराम ! मी राष्ट्रवादीमध्येच राहणार, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T115942.192

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कोणीही काळजी करु नये. आम्ही सर्वजण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आजवर पक्षामध्ये अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. पक्षातच राहणार आहोत बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार म्हणाले.

कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण झाले आहे. काही नेतेमंडळींनी देखील अशा अफवा पसरवण्याचे काम केले आहे. तसेच सध्या माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. असे पवार यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube