Download App

NCP MLA Disqualification : कुणाचे आमदार अपात्र, दादांचे की शरद पवारांचे? आज होणार फैसला

Image Credit: Letsupp

NCP MLA Disqualification Case : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष (Election Commission) आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केल्यानंतर पक्षातील आमदारांचे प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर (Rahul Narwekar) सुरू आहे. या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. कुणाचे आमदार पात्र आणि कुणाचे अपात्र ठरणार याचा फैसला आजच होण्याची शक्यता आहे. नार्वेकर आज सायंकाळी साडेचार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत.

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? शरद पवार अन् अजितदादांसाठी आजचा दिवस महत्वाचा

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील जुलै महिन्यात वेगळा निर्णय घेत राज्य सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात आमदार अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या. या याचिकांवर राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. साक्षी, नोंदी आणि उलटतपासणी घेण्यात आली.  अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले होते. या प्रकरणात निकाल कधी येणार याची उत्सुकता होती.

या निकालाआधी निवडणूक आयोगाचा निकाल आला. आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिले. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला पक्षासाठी दुसरे नाव घ्यावे लागले.  आता चिन्हही लवकरच मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज नार्वेकर अपात्रता  प्रकरणात निकाल देणार आहेत. आयोगाने कोणत्या निकषांच्या आधारे हा निकाल दिला असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विचारला होता. मात्र हा निर्णय आता झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह घ्यावं लागणार आहे. निवडणुकीच्या अगदी कमी वेळात पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना जनतेत पोहोचवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर; संजय राऊतांची घणाघाती टीका

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकावे यासाठी काँग्रेस हायकमांकडून शरद पवार यांना मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवारांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून एका चिन्हावर निवडणूक लढावी असा हा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती आहे.

 

follow us

वेब स्टोरीज