एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर; संजय राऊतांची घणाघाती टीका
Sanjay Raut : ठाकरे गटाकडून शिंदें गटावर सातत्याने टीका केली जातेय. आताही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर असल्याची टीका राऊतांनी केली. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समिती (lokadhikar samiti) अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना राऊतांनी ही टीका केली.
वागळेंच्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली? संजय राऊतांचा खडा सवाल
आपल्या भाषणात बोलतांना राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रावर आणि मुंबईवर आपला हक्क आहे. येथील प्रत्येक नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपला हक्क आहे. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाऊ नयेत. आज राज्यातून उद्योग हिसकावून एका राज्यात जात आहेत. गेल्य दहा वर्षांत केवळ 4-5 लोकांनाच रोजगार मिळाला आहे, असं म्हणत राऊतांना केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाला बीसीसीआयमध्ये सरकारने नोकरी देऊन चिकटवलं. तर दुसरा रोजगार मिळाला अदांनीना. त्यांच्या ताब्यात तर संपर्ण देश दिला. आणि महाराष्ट्रात तर भाजपने दोन कॉन्ट्रॅक्ट लेबर अपॉइंट केल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका राऊतांनी केली.
‘ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन भारी पडणार! राजदच्या दाव्याने बिहारमध्ये वाढले राजकीय तापमान
राऊत यांनी यावेळी बोलतांना मोदींनी दिलेल्या आश्वासनावरही भाष्य केलं. ते म्हणाले, दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा मोदींनी २०१४ मध्ये केली होती. त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे वर्षाला दोन कोटी युवकाना रोजगार मिळमार होता. आतापर्यंत वीस कोटी रोजगार मिळायला पाहिजे होते. मात्र, रोजगार उपलब्ध झाले नाही. दुसरीकडे आमच्या लोकाधिकार समितीने पन्नास वर्ष पूर्ण केले आहे. आणि या पन्नास वर्षात पन्नास लाख युवकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे, असं राऊत म्हणाले.
शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना राजकारण नाही. शिवेसना हे आंदोलन आहे. शिवरायांचा महाराष्ट्र अखंड राहावा, मराठी माणूस स्वाभिमानाने जगावा यासाठी हे आंदोलन उभं राहिले. आणि आता मोदी-शाह महाराष्ट्राची लूट करत आहे. ही लूट थांबवा अन्यथा आम्ही गुजरातला येऊन गुजरात लूटू, असा इशाराही राऊतांनी दिला.