Supriya Sule : घाटी आणि नांदेड मृत्यूच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारवर खटला दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सांगितलं आहे. अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे(Supriya Sule) बोलत होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे.
‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य
सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगरमधील घाटी आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील 50 लोकांच्या मृत्यूला ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, या सरकारवर खटला भरणार आहे. सरकारचं नियोजन नसल्यामुळे घाटी आणि नांदेडमध्ये 50 लोकांना जीव गमावावा लागला आहे, आज 12 लहान बालकांचा जीव गेला, याला जबाबदार महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
Ahmednagar Loksabha : विखे-गडाख लढत-1991ची अहमदनगर लोकसभा देशभर का गाजली ?
मृत्यूप्रकरणी आम्ही सरकारविरोधात खटला दाखल करणार आहोत. राजकीय विषय म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने हा खटला भरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्लीला गेले आहेत, मात्र अजित पवार गेले नाहीत. मी नांदेड, घाटी मृत्यू प्रकरणावर बिझी असल्याचे सांगितलं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
तसेच राज्यातील सरकार हे असंवैधानिक कामे करत आहे. कंत्राटी भरतीला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. कंत्राटी भरती करत आहात, तर पब्लिक सर्विस कमिशन कशासाठी आहे? मंत्रालय ही कंत्राटीवर देणार असाल तर सरकार कशासाठी असते? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी कंत्राटी भरतीचा विरोध केला आहे.
वाघनखाचा वाद पेटला; शीतल म्हात्रेंकडून विरोधकांना ‘डुप्लिकेट वाघा’ची उपमा
संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन सरकार काम करत असेल तर आगामी काळात यावर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सुळेंनी दिला आहे. नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाती मृत्यूचं तांडव पाहायला मिळाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे. या रुग्णालयात काहीच दिवस पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी आपण माणूसकीच्या नात्याने सरकाविरोधात खटला भरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी हे एक महत्वाचे रुग्णालय आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे तसेच राज्याच्या अन्य भागांतूनही येथे रुग्ण उपचारासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात.