‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य
Manoj Jarange On Sharad Pawar : तुम्ही आता गप्प बसा, आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा, असं रोखठोक भाष्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. जातिनिहाय जनगणनेनंतर दुबळा कोण आहे? त्याच्यासाठी देशाची शक्ती वापरण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर विचारलं असता मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
टीम इंडियाच्या प्रॅक्टिस मॅच पावसाने धुतल्या; वर्ल्ड कपमध्ये असे होईल नुकसान
मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा. तुम्हाला जे काय करायचं ते करा. आता मी एकदाच सगळ्या पक्षांना सांगितलंयं, तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका, तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा. त्यानंतर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा, नाहीतर आरक्षण 500 टक्क्यांवर घेऊन जावा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण द्या, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
कधी इचलकरंजीत, कधी अहमनगरमध्ये तर कधी बुलढाण्यात! गजानन महाराज म्हणून अवतरणारे बाबा नेमके कोण?
शरद पवार काय म्हणाले?
राज्यात कोणता समाज किती टक्के आहे? यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले होते.
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना? बावनकुळेंनी सांगितलं…
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ देत उपोषण स्थगित केले होते. उपोषण स्थगित करताना त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार तसेच राज्याचा दौरा करणार असल्याचेही सांगितले होते.
द सुपरहिरोची टक्कर! Harshvardhan Kapoor अन् रॉबर्ट पॅटिनसन यांचा सोहो हाऊस एन्काउंटर
त्यानुसार त्यांनी राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. आरक्षणासाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी देखील जरांगे पाटील या 13 जिल्ह्यांतील समाजबांधवांना आवाहन करणार आहेत.
दरम्यन, बिहारमध्ये जातिनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी आता चांगलीच जोर धरु लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे संकेत दिले होते.