Download App

NCP Win Nagaland Election : नॉर्थ ईस्टमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शिरकाव’

  • Written By: Last Updated:

मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्याने टिकटिक केली असून नॉर्थ ईस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका वाजू लागल्याचे पाहायला मिळत आहे.

नॉर्थ ईस्टमधील त्रिपुरा, मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडले होते. नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीने उत्तम यश मिळवत (एनडीपीपी) सत्ता राखली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने येथे ७ जिंकल्या आहेत.

Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही…

नागालँड राज्य १९६३ मध्ये अस्तित्वात आले. त्याला ६० वर्षे झाली. पण आजपर्यंत एकही महिला आमदार निवडून आली नव्हती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हेकानी जाखलू यांनी इतिहास घडवत प्रथमच विधानसभेत महिला आमदार दाखल होणार आहेत. नागालँडमध्ये ३७ जागांवर एनडीपीपी आणि भाजप (BJP) आघाडी घेतली आहे. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठे यश मिळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Tags

follow us