Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही…

Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही…

मुंबई : आम्ही कसब्यात प्रचार करून हरलो असे महाविकास आघाडी (MVA) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत असतील तर मग चिंचवड पोटनिवडणुकीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचार करत होते. मात्र, तरीदेखील चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झाला आहे. हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये. तसेच नाकाखालून ४० आमदार निघून गेले तरी उद्धव ठाकरे काहीच बोध घेत नाही, असा टोला देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्हीही उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने महाविकास आघाडी खूप जल्लोष करत आहे. परंतु, हा महाविकास आघाडीचा अजिबात विजय नाही. तर एका उमेदवाराला मिळालेली सहानुभूती आहे. त्यावर हुरळून जाऊ नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Devendra Fadanvis असे का म्हणाले? सातत्याने जिंकणारे हरले की चर्चा होतेच…

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चिंचवड मतदार संघात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला आहे. तरी तिथे तुमचा पराभव झाला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. तसेच स्वतःच्या पक्षातील ४० आमदार हे तुमच्या नाकाखाली निघून गेलेत, हे विसरू नये. त्यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा. अन्यथा २०२४ ला आम्हीच पुन्हा येणार आहे, हे विसरू नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube