NCP Political Crisis Live : एकनाथ शिंदेंनंतर काल (दि. 2) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली असून, शपथविधीनंतरही अनेक घडामोडी घडत असून, बंडखोरी केलेल्या 9 आमदारांवर शरद पवारांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या बंडखोरीनंतर राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा आढावा घेणारा हा लाईव्ह ब्लॉग…
महाराष्ट्रात भाजपाला नवा मित्रपक्ष मिळाल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुमारे 4 तास चालली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. आता केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रावादीकडून तटकरे आणि पटेल यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. तसेच उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे मुंबईत उदघाटन ठेवण्यात आले आहे.
मंत्रालयासमोरील A/5 बंगला अजित पवारांचे नवे कार्यालय असणार आहे. बाळासाहेब भवनच्या बाजूलाच पक्ष कार्यालय आहे.
पक्षाची मान्यता नसल्याने त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाने निलंबित केले आहे. त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवार यांची पत्रकार परिषद ही किटी पार्टी होती, अजित पवार गट पक्ष नाही तर फुटीर गट आहे. फुटीर गटाला व्हीप बजाविण्याचा अधिकार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या चुकीच्या आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले आहेत. ते नव्या नियुक्ता कशा करू शकतात, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पत्रकार परिषदेत अजितदादांना शरद पवारांनी फटकारले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काहींची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर आहे म्हणून अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसला आहे, असे अजितदादा म्हणाले. 9 जणांच्यावर कारवाई करावी, असे मी पाहिलं. मला आमदारांनी विधीमंडळ पक्षाचा गटनेता ठरविले आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना निलंबित करावे, असे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना कालच दिले आहे, असे अजित पवारांनी सांगितले.
आम्ही हकालपट्टी करायला बसलो नाही. पक्ष व चिन्ह ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच आहे. महायुतीच सरकार उत्तम काम करेल, असे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार यांचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. कारण आमच्याकडे बहुमत आहे. बहुसंख्य आमदारांचे व नेत्यांचे आम्हाला समर्थन आहे. कोणताही वाद होऊ नये असे आम्हाला वाटतं. वाद झाल्यास निवडणूक आयोग याचा निर्णय घेईल. आमच्या आमदार असल्याशिवाय शपथ घेतली नसती. त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती आमदार आहे.
आम्ही जी भूमिका घेतली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्याची आहे. काही जणांनी काल सांगितले होते की, आम्ही कोर्टात जाणार नाही, जनतेत जाणार. पण अचानक त्यांना रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे म्हणत अजितदादांनी जयंत पाटलांना टोला लगावला.
सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी व आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे यांची प्रदेश प्रवक्ते, महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.