Download App

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच अन् पक्षही एकच, जितेंद्र आव्हाडांनी ठणकावून सांगितलं…

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवारच(Sharad Pawar) अन् पक्षही एकच असल्याचं राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. दोन्ही गटाला उत्तर देण्याबाबत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. निवडणूक आयोगाला उत्तर दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब हेच आहे. आमच्या पक्षांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही आहे. हा पक्ष आमचाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे, निवडणूक आयोगाने पत्राची दखल घ्याया नको होती, असं आव्हाड म्हणाले आहेत. तसेच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले तुम्ही या पत्राची दखल घ्यायला नको हवी होती कारण अस काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे असे आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तसेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले आहे.

फडणवीस मास्टर ब्लास्टर! चौकार, षटकार मारतात अन् विकेटही.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलायं. मात्र, यावर अजित पवार गट पक्ष आमचा असल्याचा दावा करू शकत नाही. 5 तारखेला निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असून 30 तारखेला निवड झाली असल्याचे म्हटले आहे. मात्र, शरद पवार हेच विठ्ठल हे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला असे विरोधाभास भूमिका घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला हे लक्षात घ्यावं लागेल. याचिका पाच जुलै रोजी दाखल झाली आहे. या माध्यमातून त्यामधील संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे त्यात ते यशस्वी होतील असे त्यांना वाटत असल्याचं आव्हाड म्हणाले आहेत.

आम्ही दोघेही एकच, दोन गट असल्याचा पुरावा नाही; शरद पवार गटाचे EC ला उत्तर

तसेच प्रफुल पटेल यांनी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. मंग अजितदादा गटाची बैठक कधी घेतली त्या संदर्भातील काय पुरावे आहे का? असेल तर ते सर्व पुरावे कागदपत्र आम्ही आयोगाकडे मागितले आहे. निवडणूक आयोगाकडे रजिस्टर पक्ष राष्ट्रवादी आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात देखील म्हटले आहे की, पक्ष ही नाळ आहे. पक्षातील काही आमदार जोडून काही जण एकत्र येतात आणि नाळ तोडतात त्यांचे म्हणणे असे केलं आणि पक्ष आपला म्हणणे हे योग्य नाही हे कोर्टाने स्पष्ट म्हंटले आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने आम्हाला यावर उत्तर देण्याकरिता सांगितले होते त्यानुसार उत्तर देण्यात आले असून तुम्ही या पत्राची दखल घ्यायला नको हवी होती, असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us